बॉलिवूडला बरेच दमदार चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री काजोलच्या काही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांना आवडतात. ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ हे चित्रपट आजही टीव्हीवर लागले तरी प्रेक्षक आवडीने बघतात. कामाप्रती असलेली निष्ठा, आवड या गोष्टींमुळे हे यश तिने संपादन केले. बॉलिवूडमधील २५ वर्षांच्या करिअरमध्ये एकदाही मी शूटिंग रद्द केली नाही, असे ती अभिमानाने सांगते.

तब्येत बरी नसली, काही वैयक्तिक कारणांमुळे तर कधी प्रियकराशी किंवा प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यामुळेही काही कलाकार आजकाल शूटिंग रद्द करताना दिसतात. शूटिंगचे एखादे जरी वेळापत्रक रद्द झाले तर त्याचा निर्मात्यांना फार मोठा फटका बसतो. नुकत्याच एका कार्यक्रमात काजोल म्हणाली की, ‘गेल्या २५ वर्षांत मी एकदाही शूटिंग रद्द केले नाही. आजारपणातही मी काम केले. एकदाच सुट्टी घेतली होती जेव्हा माझी मुलगी खूप आजारी होती. एका दिवसाचे शूटिंग रद्द करणे म्हणजे निर्मात्यांचे लाखोंचे नुकसान करणे. त्यामुळे कलाकारावर ही एक मोठी जबाबदारीत असते आणि त्यांनी या गोष्टीचे भान कायम ठेवले पाहिजे.’

वाचा : विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ वादाच्या भोवऱ्यात 

काजोलच्या याच गोष्टींमुळे ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.