05 December 2019

News Flash

पहिल्या दिवशी ‘कलंक’ने रचला हा विक्रम

करण जोहरचा मल्टिस्टारर 'कलंक' हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला.

कलंक

करण जोहरचा मल्टिस्टारर ‘कलंक’ हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण पहिल्या दिवशी ‘कलंक’ने नवा विक्रम रचला आहे. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाच्या कमाईला चांगलाच फायदा झाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘कलंक’ने पहिल्याच दिवशी तब्बल २१.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१९ या वर्षातला हा प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘कलंक’ने पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ‘केसरी’ आणि ‘गली बॉय’लाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या ‘केसरी’ने पहिल्या दिवशी २१.०६ कोटी रुपयांचा तर रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ने १९.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ हा चित्रपट आलिया आणि वरुण यांचा एकत्रित सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील आलिया आणि वरुणच्या अभिनयाची स्तुती प्रेक्षकांकडून होत आहे. मात्र कथेत दम नसल्याचंही मत अनेकांनी मांडलं आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोलसुद्धा केलं आहे. तरीसुद्धा प्रदर्शनापूर्वी चर्चेत असल्याने पहिल्या दिवशी चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे.

 

First Published on April 18, 2019 12:12 pm

Web Title: kalank starts with a bang details of day one box office collection
Just Now!
X