News Flash

“करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

जुना व्हिडीओ पोस्ट करुन अभिनेत्याने करण जोहरबाबत व्यक्त केला राग

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने निर्माता, दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला आहे. करणने त्यावेळी मला कमी लेखले होते, त्यामुळे आज त्याच्यावर रडण्याची पाळी आली आहे. असं म्हणत त्याने करणबाबत आपला राग व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती

करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कमाल खानची खिल्ली उडवली होती. तो जुना व्हिडीओ पोस्ट करुन कमालने आपला राग व्यक्त केला आहे. “त्यावेळी करण माझ्यावर हसला होता. माझी खिल्ली उडवली. त्याने मला कमी लेखलं होतं त्यामुळे त्याच्यावर आज रडण्याची पाळी आली आहे.” अशा आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

अवश्य पाहा – PHOTO : शाहरुखच्या हास्याची तुलना चॉकलेटशी; अभिनेत्रीने दिल्या गोड शुभेच्छा

सुशांतच्या आत्महत्येमुळे सध्या करण जोहरवर जोरदार टीका केली जात आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी करणला जबाबदार धरले जात आहे. परिणामी त्याच्या चित्रपटांवर आता बंदी घालण्याची मागणी होतं आहे. त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्स देखील कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर करण नैराश्येमध्ये गेल्याचे म्हटले जात आहे. हे निमित्त साधून कमाल खानने करणवर निशाणा साधला आहे. त्याच्यावरील आपला राग व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 7:29 pm

Web Title: kamaal r khan criticized karan johar mppg 94
Next Stories
1 २४ वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरु
2 “90 days credit चं भूत अजूनही मानगुटीवर”; कलाकारांचे पैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी कवी
3 सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे सतत रडतोय करण जोहर; जवळच्या मित्राचा खुलासा
Just Now!
X