अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. बॉलिवूडमधील काही लांडग्यांनी मला अनेकदा घेरलं आहे पण मी कधीही माघार घेतली नाही असा चकित करणारा दावा त्याने केला आहे.

अवश्य पाहा – ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

“जेव्हा लांडग्यांची टोळी सिंहाला घेरते तेव्हा सिंह पळत नाही. खर तरं त्याने मनात आणलं तर तो लांडग्यांच्या तुलनेत खूप वेगाने पळू शकतो. पण सिंह पळत नाही उलट लांडग्यांनाच पळवतो. कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो. मला देखील बॉलिवूडमधील काही लांडग्यांनी अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी पळालो नाही तर त्यांना पळवलं आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खानने बॉलिवूडवर निशाणा साधला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल

यापूर्वी त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.