14 August 2020

News Flash

चेन्नई पूरग्रस्तांना कमल हासन यांची १५ लाखाची मदत

कमल हासन यांनी मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीसाठी १५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

कमल हासन

प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते कमल हासन यांनी मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीसाठी १५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. १५ लाख रुपयांचा धनादेश नंदगीर संगम यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती कमल हासन यंच्या व्यवस्थापकांनी दिली. सुपरस्टार रजनीकांत, सुर्या, महेश बाबू, अल्लू अर्जून, धनूश यांसारख्या अनेक कलाकारांनी तसेच उद्योजकांनी पावसामुळे उधवस्त झालेल्या लोकांच्या मदतीसाठी देणग्या दिल्या. तसेच काही कलाकारांनी लहान गट तयार करुन मदत गोळा केली.
गेल्या काही आठवड्यांमध्ये तामीळनाडूत मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील लोकांचे जिवन आता हळूहळू स्थिरस्थावर होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2015 5:54 pm

Web Title: kamal haasan donates rs 15 lakh for chennai flood relief
टॅग Kamal Haasan
Next Stories
1 बॉलीवूड ‘शहेनशहा’चा ‘नटसम्राट’ला सलाम!
2 दिलीप कुमार यांना पद्म विभूषण पुरस्कार
3 वर्षाखेर रंगणार ‘१४वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव’
Just Now!
X