News Flash

‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचं इन्स्टाग्रामवर पदार्पण

इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच अवघ्या काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १९ हजारांवर गेली.

'या' दाक्षिणात्य सुपरस्टारचं इन्स्टाग्रामवर पदार्पण

आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते कमल हसन यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्यांच्या आगामी ‘विश्वरुपम २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी त्यांनी इन्स्टाग्रामवर आपलं अधिकृत अकाऊंट सुरू केलं. ते ट्विटर आणि फेसबुकद्वारेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहेत.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर त्यांनी पहिलं पोस्ट ‘विश्वरुपम २’ संदर्भातील केलं. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत त्याचा पोस्टर हसन यांनी शेअर केला. इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच अवघ्या काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १९ हजारांवर गेली.

वाचा : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकणारे अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

‘विश्वरुपम २’ हा कमल हसन यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाला म्हणजेच ‘विश्वरुपम’ला बराच विरोध झाला होता. शिवाय या दुसऱ्या भागाच्या निर्मितीतही त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ‘विश्वरुपम २’च्या ट्रेलर प्रदर्शनाचा दिवस त्यांच्यासाठी नक्कीच खास ठरला. म्हणूनच या खास दिवशी त्यांनी इन्स्टाग्रामवरही पदार्पण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:05 pm

Web Title: kamal haasan joins instagram gains 19k plus followers in no time vishwaroopam 2
Next Stories
1 Top 5: ‘या’ पंजाबी अभिनेत्री टाकतील दीपिका- कतरिनाला मागे
2 आणखी एका प्रेमाचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; ‘झिंग प्रेमाची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘द कपिल शर्मा शो’ची ‘सेल्फी मौसी’ या शोमधून कमबॅक करणार
Just Now!
X