संपूर्ण देशात सध्या करोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. या प्राणघातक विषाणूने लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. लोकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण केले आहे. या निराशवादी वातावरणात लोकांना आशेचा किरण दाखवण्यासाठी अभिनेचा कलम हासन यांनी एका गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यामार्फत त्यांनी देशवासीयांना करोना विरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

(खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हे गाणे पाहू शकता)

‘अरीवम अनबम’ असं या गाण्याचे नाव आहे. हे गाणं स्वत: कमल हसन यांनी लिहिलं आहे. संगीतकार शंकर महादेवन, युवान शंकर राजा, आर अनिरुद्ध, संगीतकार बॉम्बे जयश्री, अभिनेता सिद्धार्थ, एंड्रिया आणि श्रुति हासन या कलाकारांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध झाले आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी कमल हासन लॉकडाउनवरुन सरकारवर साधलेल्या निशाण्यामुळे चर्चेत होते. “बाल्कनीमधील लोक सध्या जमीनीवर पाहात आहेत. आधी दिल्ली आणि आता मुंबई. प्रवासी संकटाचा हा बॉम्ब लवकरात लवकर डिफ्यूज करायला हवा अन्यथा काही खरे नाही. बाल्कनीतल्या सरकारने खाली जमिनीवर काय सुरू आहे याकडे लक्ष द्यायला हवं.” अशा आशयाचे ट्विट करुन कमल हासन यांनी सरकारवर निशाणा साधला होता.