कामसूत्र 3D मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सायरा खानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शुक्रवारी सकाळी सायरा खानने अखेरचा श्वास घेतला. सायराच्या निधनाची माहिती चित्रपट दिग्दर्शक रुपेश पॉलने सोशल मीडियावर दिली. परंतु बॉलिवूडमधून कोणत्याही कलाकाराने या घटनेवर दुख: व्यक्त केलं नाही. त्यामुळे ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये जितक्या लवकर प्रसिद्ध मिळते, तितक्याच लवकर लोक विसरुनही जातात हे यावरुन स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. ‘कामसूत्र ३D’मध्ये शर्लिन चोप्राला रिप्लेस केल्यानंतर सायरा खान चर्चेचा विषय ठरली होती.

“सायराला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती. तितकी मिळाली नाही. ती एक गुणी कलाकार होती. मात्र तिच्या निधनानंतर कोणत्याही कलाकाराने साधा शोकही व्यक्त केला नाही हे एक खंत आहे”, अशी प्रतिक्रिया रुपेश पॉल यांनी दिली.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
art
कलाकारण: इथं नव्हतं आरक्षण; तरी दिसलेच गुण!

पुढे तो म्हणतो, “ज्यावेळी सायनाच्या निधनाची माहिती कळाली त्यावेळी मला प्रचंड धक्का बसला होता. मात्र या धक्क्यापेक्षा याबाबत कोणीही रिपोर्ट केला नाही याचं जास्त वाईट वाटलं. सायरा उत्तम कलाकार होती परंतु तिला इंडस्ट्रीत हवं तसं काम मिळालं नाही. तिचं जाणं माझ्यासाठी अतिशय दुख:द घटना असून परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो”.

‘कामसूत्र ३D’मधून सायराने तिच्या करियरला सुरुवात केली होती. त्याशिवाय सायराने अनेक प्रादेशिक चित्रपटांतूनही काम केलं आहे.