News Flash

‘सुशांतसारखे कार्तिकलाही आत्महत्येस…’, कंगनाचे ट्वीट चर्चेत

‘दोस्ताना २’मधून कार्तिकला काढल्यानंतर कंगनाने केले ट्वीट

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले. त्यानंत सोशल मीडियवर अनेकांनी करण जोहरला सुनावत कार्तिकला पाठिंबा दिला. आता अभिनेत्री कंगना रणौतने देखील कार्तिकला पाठिंबा देते करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनवर निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत कार्तिकला पाठिंबा दिला आहे. ‘कार्तिक आर्यन मेहनत करुन इथपर्यंत पोहोचला आहे आणि तो असाच पुढे जात राहिल. माझी पापा जो आणि नेपो गँगला फक्त एकच विनंती आहे कृपया त्याला एकटं सोडा. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे त्याच्या मागे लागून आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका’ या आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

पुढे कंगना म्हणाली, ‘कार्तिक अशा चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. काही आर्टिकल प्रकाशित करुन आणि काही घोषणा करुन हे लोकं तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नंतर या सर्व गोष्टींना तुच जबाबदार आहेस असं सांगून स्वत: मौन राहतील. त्यांनी सुशांतला ड्रग्जचे व्यसन आहे आणि वागणूक व्यवस्थित नसल्याच्या अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या.’

कंगनाने आणखी एक ट्वीट केले आहे. ‘कार्तिक तू घाबरु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्या लोकांनी तुला कधी मदत केलेली नाही अशी लोकं तुला तोडू शकत नाहीत. आज तुला एकटं वाटत असेल आणि टार्गेट केल्यासारखे देखील वाटत असेल. पण अजीबात असं काही वाटून घेऊ नकोस. सर्वांना या ड्राम क्वीन जो बद्दल माहिती आहे’ असे ती म्हणाली.

दोस्ताना २’ या चित्रपटाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 3:26 pm

Web Title: kangana ranaut blasts karan johar over kartik aaryan ouster from dostana 2 avb 95
Next Stories
1 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपाला डान्सचे डोहाळे, गरोदरपणातही करतेय डान्स
2 ‘हे सर्व तर…’, कुंभमेळ्यातील गर्दी पाहून संतापली मलायका
3 सोशल मीडियावरूनही करणने कार्तिकचा पत्ता कट केला , इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो
Just Now!
X