01 March 2021

News Flash

धाकड’ है! कंगनाच्या चित्रपटात दिव्या दत्ताची एण्ट्री

'धाकड'मध्ये दिव्या दत्ताचा अनोखा अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे तिच्या ‘मणिकर्णिका रिटर्न्स : दि लिजेंड ऑफ दिद्दा’ या चित्रपटाची चर्चा आहे. तर, दुसरीकडे तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अर्जुन रामपालचा लूक समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.

कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील अभिनेत्री दिव्या दत्ताचा लूक समोर आला आहे. या चित्रपटात दिव्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून तिचा लूक थक्क करणारा आहे. दिव्याने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.


दिव्याचा हा फोटो पाहिल्यानंतर ती निगेटिव्ह भूमिका साकारत असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. या फोटोमध्ये तिची भेदक नजर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. “हे प्रचंड भयंकर आहे आणि याचं स्वरुप किती मोठं होईल याचा अंदाजदेखील तुम्हाला लावता येणार नाही. धाकड चित्रपटातील मी माझा नवा लूक सादर करत आहे. ज्याचं नाव आहे रोहिणी”, असं कॅप्शन दिव्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, धाकड हा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिका साकारत आहे. तर तिच्यासोबत दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोहेल मकलाई करत असून रजनीश घई या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 4:16 pm

Web Title: kangana ranaut film dhaakad divya dutta first look out ssj 93
Next Stories
1 काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावंही बदलतील; जावेद अख्तर यांचा भाजपाला टोला
2 हे WWE सुपस्टार आहेत अक्षय कुमारचे फॅन; करायचंय बॉलिवूडमध्ये काम
3 कंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या ‘क्वीन’नं दिली धमकी, म्हणाली…
Just Now!
X