News Flash

सुशांतसोबत काम करण्यासाठी कंगनाने दिला होता नकार, समोर आले कारण

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रणौतने घराणेशाही या वादावर तिचे मत मांडले. तसेच आता कंगनाने एका मुलाखतीमध्ये सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळाली होती पण तिने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली असल्याचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड चित्रपट निर्माते होमी अदजानिया हे २०१७मध्ये एका रोमँटीक चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रणौतला मुख्य भूमिकेसाठी साइन करु इच्छित होते. पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही याचा खुलासा कंगनाने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा होमी यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. मी त्यांच्या ऑफिसला जायला निघाले तितक्यात हृतिक रोशनने मला कायदेशीर नोटीस पाठवली’ असे कंगना म्हणाली.

‘गोंधळलेल्या स्थितीमध्ये मी होमी यांच्याकडे गेले. त्यांनी मला त्यांच्या आगमी चित्रपटाविषयी सांगितले. त्यावेळी मला त्यावर लक्ष देता आले नाही कारण मी त्या नोटीशीमुळे खूप गोंधळले होते. मी होमी यांना पुन्हा येईन असे म्हटले होते. पण त्यावेळी माझ्या मानसिक स्थितीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यानंतर एक वर्षभर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मी त्यावर्षी कोणताच चित्रपट साइन केला नाही. पण मला त्या चित्रपटाची कथा लक्षात आहे’ असे कंगना पुढे म्हणाली.

‘ती एक शहरातील जोडप्याची लव्हस्टोरी होती. आता जे काही झाले त्यानंतर मला असे वाटले की, जर मी त्या चित्रपटात सुशांतसोबत काम केले असते तर आमचे आयुष्य बदलले असते? मला नाही माहित’ असे कंगना म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 1:15 pm

Web Title: kangana ranaut reveals she almost did film with sushant singh rajput avb 95
Next Stories
1 ब्रूस लीसोबत फाईट केलेल्या अभिनेत्याचं उपचारादरम्यान निधन
2 गावकऱ्यांनी तलावाला दिलं सोनू सूदचं नाव; अभिनेता म्हणाला…
3 मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी चाहत्यांनी केलं ट्रॅफिक जॅम; व्हिडीओ होतोय व्हायरल…
Just Now!
X