News Flash

कंगनाच्या घरात सनईचौघडे; हळदी समारंभाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

१० वर्षानंतर कंगनाच्या घरात वाजतायेत सनईचौघडे; बॉलिवूडच्या क्वीनचा उत्साह अनावर

बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. अनेकदा या बिनधास्त प्रतिक्रियांमुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी ती कुठल्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्हे तर आपल्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या तब्बल १० वर्षानंतर सनई-चौघडे वाजणार आहेत. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

रंगोलीच्या लग्नानंतर जवळपास १० वर्ष झाली या घरात कुणाचंही लग्न झालेलं नाही. पण माझा भाऊ अक्षत आणि करणमुळे पुन्हा एकदा आमच्या घरात सनई-चौघडे वाजणार आहेत. संपुर्ण कुटुंबात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण संचारलं आहे. तीन आठवड्यानंतर आमच्या घरात सलग तीन लग्न होणार आहेत. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला आनंद व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

लक्षवेधी बाब म्हणजे ट्विटसोबत कंगनाने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या भावाच्या हळदी समारंभातील आहे. यामध्ये कंगनाच्या घरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तर कंगना तिच्या भावाला हळद लावत आहे. यात पारंपरिक पद्धतीने हा हळदी समारंभ रंगत असल्याचं दिसून येत आहे. कंगनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 7:11 pm

Web Title: kangana ranaut shares haldi ceremony video mppg 94
Next Stories
1 “शकडो सुपरस्टार येतील पण सैफ…”, करीनाने केली पतीची प्रशंसा
2 डॉक्टरांची खिल्ली उडवणाऱ्या सेलिब्रिटी ट्रेनरचा करोनामुळे मृत्यू
3 ‘माझ्या फोटोवर वाईट कमेंट केली, तर’…; मुनमुन दत्तनं ट्रोलिंगविषयी मांडलं मत
Just Now!
X