News Flash

Video : ‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’; वहिनीसाठी कंगनाची पोस्ट

वहिनीसाठी पोस्ट लिहिताच कंगना झाली भावूक

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लग्नाची धामधूम सुरु असल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या भावाचा लग्नसोहळा होता त्यामुळे ती दररोज या सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. आता कंगनाच्या भावाचं लग्न झालं असून तिने नव्या वहिनीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

“करण आणि अंजलीला आशीर्वाद द्या. आज आमच्या घरी आमची मुलगी आली आहे. पण जेव्हा अंजलीच्या आई-वडिलांचा विचार करते, त्यावेळी फार गहीवरुन येतं. आज त्यांचं घर रिकामं रिकामं झालं असेल. त्यांनी त्यांच्या काळजाचा एक तुकडा काढून आम्हाला दिला आहे. आज त्यांच्या मुलीची खोली रिकामी झाली आहे. कन्यादानपेक्षा कोणतंच दान मोठं नाही”, असं कॅप्शन कंगनाने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील कंगनाने लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. यामध्ये काही व्हिडीओंचादेखील समावेश होता. यामध्ये तिने भावाच्या हळदी समारंभाचा फोटो शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पारंपरिक पद्धतीने कंगनाच्या भावाचा हळदी सोहळा रंगल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 9:58 am

Web Title: kangana ranaut shares video from brother wedding welcomes sis in law thinking of her parents makes heart heavy ssj 93
Next Stories
1 जुही परमार आगामी मालिकेसाठी सज्ज,म्हणाली…
2 ‘बक्षीस म्हणून मिळालेली ती १०० रुपयांची नोट अखेर पोट भरण्यासाठी कामी आली’
3 “दूर राहा माझ्या घरी प्रेयसी आहे”; अभिनेत्रीला सुनावणारा सिद्धार्थ होतोय ट्रोल
Just Now!
X