28 October 2020

News Flash

‘बॉलिवूड क्वीन’च्या घरी सनईचौघडे; शेअर केला भावाच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ

कंगनाने शेअर केला भावाच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरी लवकरच सनईचौघड्यांचा आवाज घुमणार आहे. कंगनाच्या भावाचं लवकरच लग्न होणार असून सध्या संपूर्ण रणौत कुटुंब त्याच्या लग्नाच्या तयारीला लागलं आहे. नुकताच कंगनाच्या भावाचा म्हणजेच अक्षयदीप याचा हळदी समारंभ पार पडला असून त्यात कंगना हा सोहळा एन्जॉय करताना दिसून आली.

कंगनाने तिच्या भावाच्या हळदी समारंभातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कंगनाच्या घरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तर कंगना तिच्या भावाला हळद लावत आहे. यात पारंपरिक पद्धतीने हा हळदी समारंभ रंगत असल्याचं दिसून येत आहे.


दरम्यान, कंगनाच्या भावाचं लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हळूहळू त्यांच्या घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कंगना अनेक वेळा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वी तिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 6:14 pm

Web Title: kangana ranaut shares video of haldi ceremony of her brother akshat dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘घर असावं घरासारखं..’; ‘तारक मेहता’फेम अभिनेत्याने शेअर केल्या खास गोष्टी
2 ‘माझी बायको, माझी दुर्गा’; स्वप्नील जोशीने पत्नीप्रती व्यक्त केली कृतज्ञता
3 ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित
Just Now!
X