News Flash

‘प्रियांकाने कायम मला…’; ‘फॅशन’च्या सेटवर अशी होती देसी गर्लची वागणूक

कंगनाने व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौत यांचा ‘फॅशन’ हा चित्रपट आजही अनेकांच्या स्मरणात असेल. फॅशन जगतावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला. आज या चित्रपटाला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. यात अभिनेत्री कंगना रणौतने मात्र, तिला सेटवर प्रियांकाकडून कशी वागणूक मिळाली हे तिने सांगितलं आहे.

मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकली होती. तर कंगना महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाली होती. फॅशन जगतात मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींच्या आयुष्यात कसे चढ-उतार येतात हे कंगना आणि प्रियांका या दोघींनी साकारलेल्या भूमिकेतून पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे सेटवर प्रियांका मला मैत्रिणीप्रमाणे वागणूक देत होती, असं कंगनाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीत सांगितलं.

“प्रियांका केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर सहकलाकारदेखील आहे. फॅशन चित्रपट करत असताना मी केवळ १९ वर्षांची होते, तर प्रियांका त्यावेळीदेखील टॉपची अभिनेत्री होती. मात्र, तिने कधीच मला ज्युनिअर कलाकार किंवा लहान मुलगी म्हणून वागवलं नाही. तिने कायम मला एका मैत्रिणीप्रमाणे वागणूक दिली. माझ्यासोबत ती जेवायची, माझी विचारपूस करायची”, असं कंगना म्हणाली.

दरम्यान, फॅशन चित्रपटासाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं आजही कौतूक करण्यात येतं. या चित्रपटानंतर कंगना ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’, ‘तनु वेड्स मनु’, ‘गँगस्टर’, ‘मेट्रो’, ‘वो लम्हे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:59 pm

Web Title: kangana ranaut speaks on equation with priyanka chopra on 12 years of fashion ssj 93
Next Stories
1 काजलने लावली गौतमच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो
2 पायल घोषला करोना?; RPI प्रवेशादरम्यान आठवलेंच्या संपर्कात आल्याने क्वारंटाइन
3 करोना पॉझिटिव्ह स्मृती इराणी यांच्या ट्विटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला…
Just Now!
X