16 February 2019

News Flash

बॉलिवूडच्या राणीचा असाही थाट

सेलिब्रेटी आणि त्यांची लॅव्हीश जीवनशैली हा कायमच चर्चेचा विषय ठरत असतो.

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत लवकरच तिच्या आगामी ‘मणिकर्णिका- क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये तिची जोरदार चर्चा सुरु आहे. याच चर्चांदरम्यान तिचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

सेलिब्रेटी आणि त्यांची लॅव्हीश जीवनशैली हा कायमच चर्चेचा विषय ठरत असतो. त्यातच आता कंगनाच्या पर्स आणि सॅण्डलची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसापूर्वी कंगना विमानतळावर दिसून आली होती. यावेळी तिच्या पर्स आणि सॅण्डलवर अनेकांच्या नजरा खिळल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या याच पर्स, सॅण्डलचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील कंगनाची पर्स ही ९५ हजार रुपयांची असून तिचे सॅण्डल चक्क १ लाख १५ हजार रुपयांचे असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे तिचे सॅण्डल एवढे महाग असण्यामागे देखील एक कारण आहे. कंगनाचे हे सॅण्डल एक खास डिझाईनमध्ये तयार करण्यात आले असून त्याच्यावर आगीच्या पेटलेल्या ज्वालांची डिझाईन करण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक वेळा सेलिब्रेटी त्यांच्या अशा हायक्लास जीवनशैलीमुळे चर्चेत येत असतात. कंगनापूर्वी चित्रपट दिग्दर्शक करण जोहरदेखील चर्चेत आला होता. एका कार्यक्रमामध्ये करणने कोटवर लावलेल्या ब्रोचची किंमत सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळालं होतं.

 

First Published on September 7, 2018 7:03 pm

Web Title: kangana ranaut spotted with bag of cost 95 thousand and footwears of 1 25 akh