News Flash

‘खोटे संदर्भ देणाऱ्या कंगनाला रोखलंच पाहिजे’; स्वरा भास्कर संतापली

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणाऱ्या कंगनावर स्वरा भास्कर संतापली

अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या वादात आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील उडी घेतली आहे. खोटे संदर्भ देऊन समाजात गोंधळ निर्माण करणं ही कंगनाची सवय आहे, असा टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत स्वराने कंगनावर निशाणा साधला. ती म्हणाली, “कंगनाला वादग्रस्त वक्तव्य करायला आवडतं. खोटे संदर्भ देऊन ती सतत विष ओकत असते. राजकारण, चित्रपट, क्रीडा कुठलाही विषय असो ती नकारात्मक ट्विटच करत असते. विशिष्ट अजेंडा चालवणाऱ्या या मंडळींना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं पाहिजे.” असं मत व्यक्त करत स्वराने कंगनावर टीका केली.

अवश्य पाहा – ‘बिग बॉस १४’ जिंकणार कोण? या ४ स्पर्धकांना मिळालं अंतिम फेरीचं तिकिट

शेतकरी आंदोलन: ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 4:39 pm

Web Title: kangana ranaut swara bhaskar farmers protest in delhi mppg 94
Next Stories
1 ‘तुझ्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला’; हॉलिवूड दिग्दर्शकानं मानले डिंपल कपाडियांचे आभार
2 ‘रावण खलनायक नव्हता’; सैफ अली खान होतोय ट्रोल
3 बॉलिवूडमध्ये सतत रिमेकच का होतात? अर्शद वारसी म्हणाला…
Just Now!
X