News Flash

“तुझ्या वडिलांना हे प्रश्नसुद्धा विचार “; पूजा भट्टला कंगनाचं सडेतोड उत्तर

घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन पूजा भट्ट आणि कंगना रणौत यांच्यामध्ये ट्विटरवॉर

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन आता पूजा भट्ट आणि कंगना रणौत यांच्यामध्ये ट्विटरवॉर रंगलंय. कंगनाला भट्ट कुटुंबीयांनाच लाँच केलं असं म्हणणाऱ्या पूजाला आता कंगनाने उत्तर दिलं आहे. ‘कंगनाची प्रतिभा अनुराग बासू यांनी ओळखली आणि प्रत्येकाला हे माहित आहे की मुकेश भट्ट यांना कलाकारांना पैसे द्यायला आवडत नाही. प्रतिभावान कलाकारांना मोफत उपलब्ध करून देण्याचे उपकार अनेक स्टुडिओ त्यांच्यावर करतात. त्यामुळे तिच्यावर चप्पल भिरकावण्याचा, तिला वेडी म्हणण्याचा आणि तिचा अपमान करण्याचा अधिकार तुझ्या वडिलांकडे नाही’, असं ट्विट कंगना रणौतच्या टीमने ट्विटरवर केलं आहे.

”दु:खद शेवट’ अशा शब्दांत त्यांनी तिला हिणवलं. त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया यांच्या नात्यात इतकं लक्ष का दिलं? त्यांनी त्याच्याही शेवटावर का वक्तव्य केलं यांसारखे काही प्रश्न तू त्यांना जाऊन विचार. कंगनाने गँगस्टरसोबतच पोकिरी या चित्रपटासाठीही ऑडिशन दिलं होतं आणि त्यासाठीही तिची निवड झाली होती. पोकिरीसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता आणि तुला वाटतंय की ती आज जे काही आहे ते गँगस्टर चित्रपटामुळे आहे. पाण्याचा प्रवाह कोणीच रोखू शकत नाही’, अशा शब्दांत ट्विटरवर पूजा भट्टला सुनावलं.

काय होतं पूजा भट्टचं ट्विट?

‘घराणेशाही हा सध्याचा ज्वलंत विषय आहे आणि या विषयावर मला बोलण्यास सांगितलंय. ज्या कुटुंबाने नेहमीच नव्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, संगीतकारांना संधी दिली त्या कुटुंबातील व्यक्तीला घराणेशाहीबद्दल बोलायला सांगत आहेत. मी यावर फक्त हसू शकते. लोकांना सत्य स्वीकारायचं नसतं पण त्याउलट काल्पनिक गोष्टींवर त्यांचा लगेच विश्वास बसतो. कंगना खूप चांगली अभिनेत्री आहे. जर तिच्यात प्रतिभा नसती तर विशेष फिल्म्स बॅनरअंतर्गत गँगस्टर चित्रपटातून तिला लाँच केलं नसतं. अनुराग बासूने तिला शोधलं. पण विशेष फिल्म्सने तिला लाँच केलं. ही काही छोटी गोष्टी नाही.’

‘घराणेशाही हा शब्द इतरांसाठी वापरा. असे अनेक लोकं आहेत ज्यांचा आमच्यामुळे चित्रपटसृष्टीचा मार्ग मोकळा झाला. ते जर आता आम्हाला विसरले असतील तर त्यांचं दुर्दैव आहे, आमचं नाही’ असं पूजाने ट्विट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 6:36 pm

Web Title: kangana ranaut team slams pooja bhatt in response to her nepotism tweet ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर गायिकेने घेतला मोठा निर्णय
2 भट्ट कुटुंबीयांनी कंगनाला लाँच केले, घराणेशाही वादावर पूजा भट्टने सोडले मौन
3 केवळ ३३ टक्के युनिटच्या उपस्थितीत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात- आदिनाथ कोठारे
Just Now!
X