News Flash

२०२४मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार, कंगना रणौतने केलं ट्विट

कंगनाचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. याव्यतिरिक्त कंगना नेहमीच भाजप सरकारआणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसते. त्यातच आता कंगनाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सुचविणार्‍या अहवालाच्या आधारे कंगनाने एक ट्विट केले आहे. कंगनाच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहिरपणे सांगते की २०२४ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे. २०१४ मध्ये निवडणूक जिंकत नरेंद्र मोदी पहिलांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आणि मोदींचं पंतप्रधान पद कायम राहिलं. यावरूनच कंगनाने हे ट्विट करत २०२४ मध्ये ही नरेंद्र मोदी निवडणूक जिंकत पंतप्रधान असतील असं म्हटलं आहे.

कगंना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 4:17 pm

Web Title: kangana said in 2024 modi will rejoin as pm dcp 98
टॅग : Kangana Ranaut
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांना ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
2 पाठक बाईंचा भन्नाट डान्स, मैत्रिणींसोबत अक्षयाची धमाल
3 पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, बबड्याची भावूक पोस्ट व्हायरल
Just Now!
X