28 February 2021

News Flash

‘हे असं काहीतरी होणार मला ठाऊक होतं’, कंगनाच्या निशाण्यावर मीना हॅरिस

कंगनाचे ट्वीट चर्चेत आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. दरम्यान कंगनाने आता एक नवं वक्तव्य केलं असून त्यात तिने मीना हॅरीसवर निशाणा साधला आहे. मीना हॅरिस ही अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची आहे.

कंगनाने ‘न्यु यॉर्क पोस्ट’चे ट्विट रिट्विट केले आहे. “हे असं काहीतरी होणार मला ठाऊक होतं. कालच मी ट्विट करुन यासंदर्भातील भविष्यवाणी करत लिब्रल (उदारमतवादी लोकांना) माझ्या खोचक ट्विटने जळफळाट करणारा टोमणा मारण्याची संधी गमावली. हा हा हा… असो पुढच्या वेळेस करेन मी हे…”, अशा अर्थाचं ट्विट कंगनाने केलं आहे.

 

मीना हॅरीसने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करताच कंगनाने तिच्यावर निशाना साधला होता. कंगनाने पहिल्यांदाच कोणावर टिका केली नाही. तर, या आधी कंगनाने ट्विटरच्या सीईओवर देखील निशाना साधला होता.

कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या कंगना ‘धाकड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 6:57 pm

Web Title: kangana tweet about meena harris is using her aunt kamla harris name for brand building dcp 98 avb 95
Next Stories
1 पूजा-गश्मीरच्या ‘त्या’ व्हायरल चॅट मागचं जाणून घ्या सत्य
2 कठीण काळात वडिलांनी पण मदत केली नाही – कंगना रणौत
3 इथे राहतात सौ. माने, स्वानंदी बेर्डेची रंगमंचावर एण्ट्री
Just Now!
X