13 August 2020

News Flash

‘स्वदेस’मधल्या कावेरी अम्मासाठी शाहरुखची भावनिक पोस्ट

सिगारेट ओढणाऱ्या शाहरुख खानला ओरडणाऱ्या किशोरी अम्मा यांचे निधन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काय म्हणाला शाहरुख खान?

“किशोरी अम्मा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. आंम्हाला तुमची कायम आठवण येईल. मी धुम्रपान करायचो त्यावेळी ज्या प्रकारे त्या मला ओरडायच्या तो क्षण फार आठवेल.” अशा आशयाचे ट्विट करुन शाहरुखने किशोरी बलाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

“किशोरी बलाल यांच्या निधनामुळे प्रचंड दु:ख होत आहे. तुमच्या स्वभावातला दयाळूपणा, सहृदयपणा आणि प्रेम यामुळे कायम तुम्ही आमच्या लक्षात रहालं. तसंच स्वदेसमधील तुम्ही साकारालेली कावेरी अम्मा कायम आठवणीत राहण्यासारखी आहे. खरंच तुमची फार आठवण येईल”, अशी पोस्ट आशुतोष गोवारीकर यांनी शेअर केली. सोबत किशोरी बलाल यांचा फोटोही शेअर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 5:10 pm

Web Title: kannada actress kishori ballal dies at 82 shah rukh khan mppg 94
Next Stories
1 ओळखलंत का या लोकप्रिय अभिनेत्याला?
2 ‘…तर तुझ्या आई-वडिलांचा उद्धार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही’; नेहा संतापली
3 रजनी Vs Wild: बेअर ग्रिल्ससोबत ‘थलायवा’ करणार शिकार
Just Now!
X