05 March 2021

News Flash

व्हिडीओ शूट करुन अभिनेत्रीची आत्महत्या

प्रियकरावर केले गंभीर आरोप

छोट्या पडद्यावरील दाक्षिणात्य अभिनेत्री चंदना हीने व्हिडीओ शूट करत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंदना कन्नड अभिनेत्री असून आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रियकरावर गंभीर आरोप करत त्याने फसवणूक केल्याचं म्हटलं आहे.  या प्रकरणी प्रियकराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनुसार, २९ वर्षीय चंदनाने आत्महत्या करण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर दिनेश याच्यावर शारीरिक आणि मानसिक शोषणाचे तसंच फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. चंदनाने २८ मे रोजी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करुन आत्महत्या केली. त्यानंतर १ जून रोजी तिचा व्हिडीओ समोर आला आहे.

चंदनाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजताच दिनेश तिला रुग्णालयात घेऊन गेला. मात्र रुग्णालयात पोहोचताच तिचा मृत्यू झाला. या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या भीतीने दिनेशने रुग्णालयातून पळ काढला. या प्रकरणी दिनेश आणि त्याच्या कुटुंबीयांवर एफआरआय दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी सुरु आहे.

दरम्यान, चंदना आणि दिनेश गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या घरातल्यांनाही ठावूक होतं. त्यामुळे चंदनाचे कुटुंबीय दिनेशच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र दिनेशच्या घरातल्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली.तसंच दिनेशनेदेखील लग्न करण्यास नकार दिला, त्यामुळेच चंदनाने हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:27 pm

Web Title: kannada actress records video herself she commits suicide accuses her lover ssj 93
Next Stories
1 ‘बेफिक्रे’मध्ये रणवीरने २३ वेळा दिला किसिंग सीन; दीपिका म्हणाली…
2 आधी करोना अन् आता चक्रीवादळ; अर्शद वारसीने केली उद्धव ठाकरेंच्या कामाची स्तुती
3 Video : “ये राष्ट्र पुन: खडा होगा..”; संकर्षणची प्रेरणादायी कविता
Just Now!
X