News Flash

तुझ्या सोबत काम करण्याची संधी मिळेल का?; कपिल शर्माने दिले भन्नाट उत्तर

जाणून घ्या कपिल काय म्हणाला...

कॉमेडियन कपिल शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सध्या तो छोट्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतो. १ फेब्रुवारी २०२१ रोजी कपिलच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्याने सोशल मीडियाद्वारे बाबा झाल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या कपिलने एका चाहत्याला भन्नाट उत्तर दिल्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.

एका चाहत्याने कपिलला ट्वीट करत एक प्रश्न विचारला आहे. ‘मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. मला संधी मिळू शकते का?’ असे त्या चाहत्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे. हे ट्वीट त्याने कपिलला टॅगल केले आहे.

कपिलने त्या चाहत्याचे ट्वीट वाचून भन्नाट उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल. चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत ‘भाई, मी स्वत: सध्या घरी बसलो आहे’ असे म्हणत काही इमोजी वापरले आहेत.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी महिन्यापासून कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ बंद आहे. त्यामुळे चाहते कपिलची आतुरतेने वाट पाहात आहेत. मे महिन्यात पुन्हा या शोचे चित्रीकरण सुरु होणार आहे असे म्हटले जात आहे. तसेच शोच्या चित्रीकरणाची तयारी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 4:10 pm

Web Title: kapil sharma funny reply when fan asked him can i get chance to work with you avb 95
Next Stories
1 ‘त्यांनी मला न सांगताच….’, महिमा चौधरीने केला राम गोपाल वर्मावर आरोप
2 झायरा वसिम, सना खान नंतर ‘या’ अभिनेत्याने मनोरंजन सृष्टीला केला रामराम
3 लग्नासाठी प्राची देसाईने ठेवली अट, म्हणाली…
Just Now!
X