छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्माच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोडंस मुलीला जन्म दिला आहे. त्याने ट्विट करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. तसेच त्याने त्यासोबत आपल्या मुलीचा पहिला फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

कपीलने आपल्या मुलीचे नाव ‘अनायरा’ असे ठेवले आहे. “भेटा माझ्या काळजाच्या तुकड्याला” अशा आशयाचे ट्विट करुन त्याने आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात हजारो नेटकऱ्यांनी कपीलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आपल्या विनोदाने टेलिव्हिजन विश्व गाजवणारा विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्मा बऱ्याच काळापासून त्याच्या लव्ह लाइफबद्दल गुप्तता बाळगून होता. २०१७ मध्ये त्याने गिन्नीच्या फोटोसह एक खास ट्विट करत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विविहबंधनात अडकले होते. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती.