27 February 2021

News Flash

कपिल शर्माची ऑफस्क्रीन मस्ती पाहिलीत का? पाहा व्हिडीओ

'बिहाइन्ड द जोक्स विथ कपिल' लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि गाजलेला कॉमेडी शो म्हणजेच ‘द कपिल शर्मा शो.’ कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या शोच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करत असतो. या शोचे चाहते जगभरात आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील कपिलच्या शोमध्ये येऊन त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतात. ऑनस्क्रीन कपिल शर्मा शोच्या कास्टची गंमत तर सर्वांनीच पाहिले आहे. पण आता कपिल शर्मा ऑफस्क्रीन मस्ती घेऊन त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘द कपिल शर्मा’ शोच्या पडद्यामागील मस्तीचे व्हिडीओ घेऊन कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. ‘बिहाइन्ड द जोक्स विथ कपिल’च्या माध्यमातून तो सेटवरची संपूर्ण मस्ती दाखवणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. ‘बिहाइन्ड द जोक्स विथ कपिल’मधील एक व्हिडीओ कपिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कलाकारांची ऑफस्क्रीन मस्ती पाहायला मिळते.

व्हिडीओच्या सुरुवातीला कपिल सर्वांना सेटवर घेऊन जात आहे. त्यानंतर तो सेटवर येण्याआधी कसा तयार होतो, त्यावेळी कपिल कशा प्रकारे विनोद करुन सगळ्यांना हसवतो. या व्यतिरिक्त अनेक छोट्या छोट्या क्लिप्स या व्हिडीओमध्ये आहेत. अशा अनेक गोष्टी त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, करोनाच्या संकटानंतर शो पुन्हा एकदा सुरू झाला असून चाहते तो तितक्याच आनंदाने पाहात आहेत. या शो प्रमाणे कपिलचा बिहाइन्ड द जोक्स विथ कपिल लोकांचे मनोरंजन करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 2:40 pm

Web Title: kapil sharma is coming with a behind the jokes with kapil to entertain the people dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘मी सोनू सूदवर हात उचलू शकत नाही’, मेगास्टार चिरंजीवी यांचा खुलासा
2 सुशांतचे वडील रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
3 तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीनाची खास पोस्ट, “तुझ्या अम्माशिवाय कोणीच..”
Just Now!
X