काही महिन्यांपूर्वी वादाच्या दृष्टचक्रात अडकेल्या कपिलच्या आयुष्यात आता ‘अच्छे दिन’ लवकरच परतणार आहे. सार्वजनिक आयुष्यापासून स्वत:ला पूर्णपणे दूर ठेवलेल्या कपिलनं आता कॅमबॅकसाठी चांगलीच कंबर कसली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन तो दिवाळीत छोट्या पडद्यावर परतणार आहे. पण त्याचबरोबर कपिलच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडणार आहे. या वर्षाअखेरीस कपिल बोहल्यावर चढणार आहे.
डिसेंबर महिन्यात कपिल आपली प्रेयसी गिन्नीसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती कपिलच्या जवळच्या मित्रानं ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली आहे. कपिलच्या मुळ घरी अमृतसरमध्ये थाटामाटात ‘बिग फॅट पंजाबी वेडिंग’ पार पडणार आहे. चार दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे याची तयारीही सुरू झाली असल्याची माहिती कपिलच्या मित्रानं दिली आहे.
बॉलिवूडमधल्ये अनेक तारे- तारका कपिलच्या विवाहसोहळ्यासाठी पंजाबला जाणार असल्याचं समजत आहे. त्यानंतर मुंबईत इतर कलाकारांसाठी कपिल पार्टीचं आयोजन करणार असल्याचंही समजत आहे. गेल्याच वर्षी मार्च महिन्यात कपिलनं सोशल मीडियाद्वारे गिन्नीसोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 12:34 pm