सध्या सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ देशातील लोकप्रिय शोमधील एक मानला जातो. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात. नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदाने पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासह हजेरी लावली होती. दरम्यान शोचा सध्याचा हुकुमी एक्का मानला जाणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेकला निर्मात्यांकडून सेटपासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे गोविंदाची पत्नी सुनीता यांच्या सांगण्यावरुन कृष्णाला एका एपिसोडपासून दूर ठेवण्यात आले होते. आता खुद्द कृष्णाने एपिसोड पासून दूर जाण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

नुकताच कृष्णाने बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने खुलासा केला आहे. ‘मी त्या एपिसोडमध्ये सहभागी होऊ नये अशी सुनीता मामीची इच्छा असल्याचे मला टीम कडून कळाले. मी ते येण्यापूर्वीच्या भागामध्ये सहभागी झालो आणि नंतर सेटवरुन निघून गेलो. खरतर मी साकारत असलेली सपनाची भूमिका ही शोमध्ये फार महत्त्वाची आहे. पण मामीची ही मागणी ऐकून मला धक्का बसला आणि वाईटही वाटले’ असे कृष्णा म्हणाला.

आणखी वाचा : गोविंदाने केले तिसरे लग्न, पत्नी म्हणाली…

गोविंदा मुलगी टीना हिच्या आगमी अल्बमच्या प्रमोशनसाठी ‘कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. टीनाच्या या गाण्याचे नाव ‘मिलो ना तुम’ असे आहे. या अल्बमचे दिग्दर्शन गजेंद्र वर्माने केले आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी टीना आई-बाबा आणि गजेंद्रसह कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होती.