गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यामधील वाद चर्चेत आहे. दोघेही एकमेकांवर निशाणा साधताना दिसतात. काही दिवसांपूर्वी गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्या एपिसोडच्या वेळी कृष्णा तेथे उपस्थित नसल्याचे दिसले होते. आता नुकताच पार पडलेल्या कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने हजेरी लावली. दरम्यान कपिलची संपूर्ण टीम मजामस्ती करताना दिसत होती.

‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा सपना बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत होता. दरम्यान तो नवाजचा अतिशय लोकप्रिय डायलॉग ‘सबका प्रमोशन करुंगी मैं, माँ का, बाप का, दादा का’ असे कृष्णा बोलताना दिसतो. तेवढ्यात कपिल ‘आणि मामाचे?’ असे म्हणत कृष्णाला टोमणा मारताना दिसतो.

कपिलचे बोलणे ऐकून कृष्णा त्यावर मजेशीर अंदाजात उत्तर देताना दिसतो. ‘ते आत्ताच तर प्रमोशन करुन गेले’ असे कृष्णा म्हणतो. ते एकून सर्वांना हसू अनावर होते.

काही दिवसांपूर्वी गोविंदाने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कृष्णाने शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. अनेकांनी कृष्णाला यामागचे कारण विचारले होते. त्यावर कृष्णाने त्याच्या आणि गोविंदामध्ये थोडे वाद सुरु आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विनोद करणे शक्य नसल्याचे म्हटले होते.