25 February 2021

News Flash

The Kapil Sharma Show Teaser : पोट धरून हसवायला ‘कॉमेडीचा बादशहा’ परत आलाय!

हा टिझर कपिलच्या आधीच्या एकूणच प्रमोशनल व्हिडिओपेक्षा खूपच वेगळा आणि प्रेक्षकांच्या  हृदयाला थेट हात घालणारा वाटला.

कपिल शर्मा

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारा कपिल शर्मा आता पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. कपिलच्या नव्या कोऱ्या ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला वहिला टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

नव्या शोच्या पहिल्याच टिझरमध्ये गतकाळातील विस्मृत्तींना उजाळा दिलाय. हा टिझर कपिलच्या आधीच्या एकूणच प्रमोशनल व्हिडिओपेक्षा खूपच वेगळा आणि प्रेक्षकांच्या  हृदयाला थेट हात घालणारा वाटला. पूर्वी आठवड्यातून एकदा येणारा कपिलचा शो हा कित्येकांसाठी तणाव दूर करणारा, दु:ख विसरायला लावणारा, कुटुंबाला एकत्र आणणारा होता. हेच नव्या टिझरच्या प्रमोशनमधून दाखवण्यात आलं आहे.

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ हे कपिलचे दोन शो छोट्या पडद्यावर खूपच गाजले. या शोनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. याच शोमुळे विनोदवीर कपिल शर्मा हा कॉमेडीचा बादशहा आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षाही सर्वाधिक मानधन घेणारा स्टार ठरला. मात्र सहकलाकरांसोबत झालेल्या वादानं कपिलचा शो बंद पडला. जे त्याच्यासोबत राहिले त्याच्या मदतीनं त्यानं एप्रिल महिन्यात नवा शो सुरू केला पण पहिल्याच भागानंतर तो बंद पडला.

त्यानंतर कपिल पूर्णपणे नैराश्येत गेला. गेल्या कित्येक महिन्यांपासून झगमगत्या दुनियेपासून लांब राहिलेला कपिल आता पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत मात्र हा शो छोट्या पडद्यावर कधी सुरू होतोय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:49 pm

Web Title: kapil to return to tv the kapil sharma show teaser
Next Stories
1 ”तुला पाहते रे’ महाराष्ट्रासाठी घातक, मालिका बंद करा’
2 मी आणि रजनीकांत सेटवर मराठीतच बोलायचो – अक्षय
3 Video : ‘इसबार भी वो अंधेरा छाएगा’, थरकाप उडवणारा ‘अमावस’चा टीझर
Just Now!
X