News Flash

‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर; तिच्या सांगण्यावरून टेकडीवरून मारली होती उडी

Birthday special :

बॉलिवूडचा पापा जो म्हणजे करण जोहरचा आज वाढदिवस आहे. करण आज ४९ वा वाढदिवस साजरा करतोय. करणने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्याचसोबत अनेकदा बेधडक वक्तव्य केल्यामुळे करण जोहर चर्चेत आला आहे. काही वेळेला त्याला टीका देखईल सहन करावी लागली आहे. करणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

करणचा जन्म मुंबईत झाला असून त्याचे वडील यश जोहर प्रसिद्ध सिनेनिर्माते होते. तसचं त्यांनी धर्मा प्रोडक्शनची स्थापना केली. करणच्या आईचं नाव हिरू जोहर आहे. करण मुंबईतील ग्रीनलान्स हायस्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकनॉमिक्‍समधून त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. अगदी कमी वयातच करणने दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान अशा अनेक सिनेमांचं त्याने दिग्दर्शन केलं.

शो ‘कॉफी विथ करण’ या करणच्या गाजलेल्या टॉक शोमधून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांचा खुलासा केला आहे. याच शोमध्ये करणने देखील त्याच्या आयुष्यातील एका महत्वाच्या गोष्टीचा खुसाला केला होता. करणने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल धक्कादायक खुलासा या शोमध्ये केला होता. करणने तो एका मुलीवर खूप प्रेम करत असून ती एक बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं सांगितलं होतं. एवढचं नाही तर या मुलीच्या सांगण्यावरून करणने एका उंच टेकडीवरून उडीदेखील मारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

करण जोहरचं हे पहिलं प्रेम म्हणजे अभिनेत्री ट्विंकल खन्ना होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दोघांनी यावर चर्चा देखील केली होती. तसचं ट्विंकल खन्नाने तिच्या ‘मिस फनी बोन्स’ या पुस्तकातही करण तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा य़ा गोष्टीचा खुलासा केलाय. करण आणि ट्विंकल एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. यावेळी करणला सारखी भूक लागायची आणि तो ट्विंकलला कॅनटीनमधून जेवणं चोरायला सांगायचा असा खुलासाही ट्विंकलने केला आहे.

करण सध्या त्याची आई आणि दोन मुलांसोबत राहतो. करणला रुही आणि यश ही मुलं असून सरोगसीच्या मदतीने त्यांचा जन्म झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 8:52 am

Web Title: karan johar birthday special unknown facts he is in love with twinkel khanna kpw 89
Next Stories
1 Video: शिल्पा शेट्टीने शेअर केला मुलीचा क्यूट व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल
2 ‘द फॅमिली मॅन २’ वादाच्या भोवऱ्यात; सीरिजवर बंदी घालण्याची राज्यसभा खासदाराची मागणी
3 “अलिबागकरांचं डोकं फिरलं तर…”; मनसेचा आदित्य नारायणला थेट इशारा
Just Now!
X