अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे करण चांगलाच खचला आहे, असं त्याच्या जवळच्या मित्राकडून सांगण्यात आलं होतं. परंतु, नुकताच तो एका पार्टीमध्ये दिसल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी नुकताच त्यांचा ६२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या बर्थडे पार्टीमध्ये कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांचा समावेश होता. या पार्टीत करण जोहरदेखील दिसून आला. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करण दिसून येत आहे.
नीतू यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, रीमा जैन, अरमान जैन आणि करण जोहरसह अन्य काही कलाकार मंडळी दिसून येत आहेत.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर करणवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियापासून फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे तो खचल्याचंही म्हटलं जात होतं. परंतु, त्याला पार्टीत पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:45 pm