करण जोहरचा २०१२ मध्ये आलेला ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि अभिनेत्री अलिया भट्ट या तिघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्या तिघांच्या अभिनयाची त्यावेळी जोरदार चर्चा झाली. त्यानंतर वर्षभरापूर्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी ट्विट करत ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ येणार असल्याचं जाहीर केलं. वर्षभरापूर्वी घोषणाकेल्यानंतर हा चित्रपट कधी येणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून होती, पण लोकांची उत्सुकता फार काळ ताणल्यानंतर करणने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ हा चित्रपट २३ नोव्हेंबर २०१८ ला जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं करणनं ट्विट करत सांगितलं.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार आहे. पण, टायगरसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार आहे हे मात्र अजूनही गुप्त ठेवण्यात आलं आहे. करणने केलेल्या ट्विटनुसार या चित्रपटात दोन मुख्य अभिनेत्री असणार आहेत पुढील महिन्यात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या दोन अभिनेत्रींची वर्णी या चित्रपटात लागणार आहे याबाबत कामालीची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.