News Flash

..म्हणून सलमानसोबतची कॉफी करणसाठी अधिक ‘टेस्टी’

या कार्यक्रमामुळे मला एक वेगळे व्यक्तिमत्व मिळाले.

करण जोहर

‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम जितका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे तितकीच त्याची सेलिब्रिटींमधली ‘क्रेझ’ देखील सध्या पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करणने जेव्हा या कार्यक्रमाला सुरुवात केली, त्यावेळी या शोबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या या कार्यक्रमाची चलती दिसत आहे.  येत्या रविवारी करण जोहर आपल्या ‘कॉफी विथ करण’ च्या १०० व्या भागाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड दंबग सलमान खान सहभागी होणार आहे. यावेळी त्याच्यासह अरबाज आणि सोहेलही असतील. त्यामुळे करणचा हा  शतकी महोत्स अधिक रंजक असणार यात शंका नाही. दरम्यान आपल्या या कार्यक्रमाबद्दल करणने नुकतीच प्रतिक्रिया दिली. सलमानच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या १०० व्या भागाची करण आतुरतेने वाट पाहत आहे.

बॉलिवूडच्या मंडळींसोबत रंगणारी मैफल माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनली असल्याचेही  करणने सांगितले. या कार्यक्रमामुळे मला एक वेगळे व्यक्तिमत्व मिळाले आहे. असे देखील करण यावेळी म्हणाला. सुरुवातीच्या काळात मला या कार्यक्रमाबद्दल उलट सुलट सल्ले मिळाले होते. या कार्यक्रमामुळे निर्माता म्हणून तुझी अनेक रहस्य जगजाहीर होतील, त्यामुळे तुझे महत्त्व कमी होईल असे अनेकांनी मला सांगितले. मात्र आज या कार्यक्रमाने सर्वांना खोटे ठरविले आहे. असे त्याला सुचवायचे होते.  निर्मात्याने आशा प्रकारचा शो करणे कमीपणाचे असल्याचे देखील करणला ऐकावे लागले होते.

मी जसा आहे तसे लोकांनी मला स्वीकारणे हे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ‘कॉफी विथ करण’च्या व्यासपीठावरुन हे सहज शक्य झाल्याचे करण यावेळी म्हणाला. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचे करण २००४ पासून आयोजन करत आहे. या कार्यक्रमाचा १२ वर्षाचा प्रवास आता शतकाला गवसणी घालत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या भागांचे शतक साजरे होत असल्यामुळे मी  भावूक झालो आहे, असेही  करण म्हणाला. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट कार्यक्रमाने थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. हा शो थोड्याच भागांचा असतो यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळी आवर्जुन येतात. करण स्वतः सिनेनिर्माता आणि सुत्रसंचालक आहे. आपल्या मंचावर लोकप्रिय कलाकारांना बोलावून तो त्यांची गिरकी घेत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 10:47 pm

Web Title: karan johar said koffee with karan became biggest part of my personality
Next Stories
1 ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीमुळे रणवीर कायद्याच्या कचाट्यात
2 Video सलमान-शाहरुखची ही भेट अविस्मरणीयच
3 ‘डॅडी’ सिनेमामुळे अर्जुन आला अडचणीत
Just Now!
X