29 May 2020

News Flash

आता बॉलिवूडमध्ये सौरव गांगुलीची ‘दादागिरी’?

कोण साकारणार भूमिका?

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही ५० लाख किमतीचा तांदुळ गरीब आणि गरजू व्यक्तींमध्ये वाटला आहे.

खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचा सध्या ट्रेण्डच आला आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हे बायोपिक प्रदर्शित झाले तर बॅडमिंडनपटू सायना नेहवाल, क्रिकेटर मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्याही आयुष्यावर बायोपिक येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आता आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येणार असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं कळतंय.

करण जोहर काही दिवसांपूर्वी सौरव गांगुली यांना भेटला होता. त्यावेळी दोघांमध्ये बायोपिकबद्दल चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. सौरव गांगुलींना दादा म्हटलं जातं, म्हणून या बायोपिकचं नाव ‘दादागिरी’ असं ठेवलं जाऊ शकतं.

Photos: कोट्यधीश अनुष्का शर्माची संपत्ती; आकडा पाहून व्हाल थक्क!

सौरव गांगुलींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका कोण साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एका मुलाखतीत गांगुली यांनी त्यांच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनचं नाव घेतलं होतं. “हृतिक माझी भूमिका उत्तमरित्या साकारू शकतो असं मला वाटतं”, असं त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 2:29 pm

Web Title: karan johar to make biopic on sourav ganguly reports ssv 92
Next Stories
1 बलात्काराचे आरोप सिद्ध होताच चित्रपट निर्मात्याला आला हार्ट अटॅक
2 लवकरच होणार मोठ्या पडद्यावर ‘झोलझाल’
3 बनावट ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारामुळे अभिनेत्री अडचणीत
Just Now!
X