छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि बिनधास्त अभिनेता म्हणून करण पटेल ओळखला जातो. त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असून सोशल मीडिया पोस्टद्वारे तिची खिल्ली उडवली आहे. त्याने पोस्टमध्ये कंगना आणि अभिनेता आर. माधवनचा चित्रपट तन्नू वेड्स मन्नूचा उल्लेख केला आहे. सध्या त्याची ही पोस्ट चर्चेत आहे.

नुकताच करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने कोणाचेही नाव घतलेले नाही. ‘मी नेहमी विचार करायचो तन्नू वेड्स मन्नू १ आणि २, दोन्ही चित्रपटांमध्ये जो अभिनेता आहे तो बायकोपासून दूर का पळायचा? याचा अर्थ मला आज कळाला. त्या चित्रपटातील नायकाच्या पत्नीच्या मानसिक संतुलनाचे प्रदर्शन सध्या न्यूज चॅनेलमध्ये पाहात आहे’ असे त्याने म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यावेळी करणने अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये कंगनावर निशाणा साधला होता. ‘सध्या एक अभिनेत्री घराणेशाही विषयी बोलत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. मग तिने सुशांतला तिच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी का नाही दिली. मी तिला कधीच नविन दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत काम करताना पाहिले नाही’ असे त्याने म्हटले होते.