News Flash

सैफच्या ‘या’ सवयीला करीना वैतागली; लग्नाच्या सात वर्षांनंतर केला खुलासा

'द लव्ह लाफ लाइव्ह शो'मध्ये करीनाने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

सैफ अली खान, करीना कपूर

‘द लव्ह लाफ लाइव्ह शो’ या टॉक शोमध्ये नुकतीच अभिनेत्री करीना कपूर खानने हजेरी लावली होती. या शोमध्ये करीनाने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी बोलताना सर्व प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने दिली. सैफची अशी कोणती सवय आहे ज्याचा तिला फार वैताग येतो, हेसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितलं.

सैफच्या स्वभावाविषयी सांगताना ती म्हणाली, “सैफला पार्ट्यांना जायला आवडत नाही. कोणत्याही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाणं आवडत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की तो खोटं बोलू शकत नाही. त्यामुळेच तो अशा ठिकाणी जाणं कटाक्षाने टाळतो. कदाचित याच स्वभावामुळे इंडस्ट्रीत आमचे खूप कमी मित्र आहेत.”

आणखी वाचा : काजोलने सांगितली नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण

सैफच्या आवडीनिवडींविषयी तिने पुढे सांगितलं, “त्याला वाचनाची खूप आवड आहे. सैफची एक सवय आहे ज्याला मला फार वैताग येतो. जेव्हा मी त्याला एखादी गोष्ट सांगते त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ अशी असते. नंतर तो मला अचानक फोन किंवा मेसेज करून होकार कळवतो. मग मी त्याच्यावर चिडते की तुला काही वेळापूर्वी मी हीच गोष्ट विचारली होती, त्यावेळी नाही का बोललास? तेव्हा मात्र त्याच्याकडे उत्तर नसतं.”

सैफ आणि करीना ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 11:42 am

Web Title: kareena kapoor is annoyed with this habit of saif ali khan ssv 92
Next Stories
1 रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओतील चिमुकली आहे तरी कोण?
2 सलमानने ‘दबंग ३’मधील कोस्टार सुदीप किच्चाला दिले सर्वात महागडे गिफ्ट
3 काजोलने सांगितली नऊवारी साडीतली ‘ती’ खास आठवण
Just Now!
X