News Flash

विश्वचषकातील सामना पाहण्यासाठी करिना आणि सैफ इंग्लंडला

तैमूरसोबत करिना आणि सैफ सुट्यांचा आनंद लुटत आहेत

अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान कामतून वेळ काढून तैमूरसह सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी विदेशात फिरायला गेले आहेत. त्यांचे यूरोपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच यूरोपमधील सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर खान परिवार विश्वचषक पाहण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

‘मुबई मिरर’च्या वृत्तानुसार करिना आणि सैफ विश्वचषक पाहण्यासाठी इंग्लंडला जाणार आहेत. नऊ जून रोजी होणारा भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामन्याचा आनंद दोघे घेणार आहेत. सामना पाहताना करिना, सैफ आणि तैमूर भारतीय संघाची जर्सी घालून विराटसेनाला पाठिंबा देणार आहेत. भारतीय जर्सीमधील करिनाचा ग्लॅमरस लूक पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत.

प्रसिद्ध ड्रेस डिझायनर पूनम दमानियाने करिना आणि सैफचे हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिने तैमूरला उचलून घेतले आहे. तैमूर अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे.

पाच जून रोजी भारतीय संघाच्या विश्वचषक अभियानाला सुरूवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होत आहे. यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असून भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी अनेक चाहते रवाना झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 6:13 pm

Web Title: kareena kapoor khan and saif ali khan are going to attend icc world cup 2019 match
Next Stories
1 भारतच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी शाहरुखला आमंत्रण?
2 दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय
3 प्रियकराच्या मृत्यूनंतर खचून मलेशियाला गेलेली अंकिता मिलिंदला भेटली अन..
Just Now!
X