X

करिना म्हणते, दुसऱ्या बाळाचा विचार सुरू पण..

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर अली खान सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असतो. त्याचं स्टारडम एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

खास मैत्रीण अमृता अरोरासोबत करिनाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. चित्रपट समीक्षक कोमल नाहटा या दोघींची मुलाखत घेत होते. करिना आणि अमृतामध्ये गप्पा रंगल्या असताना, ‘तू पुन्हा प्रेग्नन्सी प्लान करत असशील तर मला सांग. मी देशच सोडून जाईन’ असं अमृता करिनाला म्हणाली. त्याचवेळी तू दुसऱ्या बाळाचा विचार करत आहेस का असा प्रश्न नाहटा यांनी करिनाला विचारला. या प्रश्नावर करिना उत्तर देणं टाळेल असं अनेकांना वाटलं होतं, पण तिने मोकळेपणानं उत्तर दिलं. ‘हो, आम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करत आहोत, पण इतक्यात नाही. किमान दोन वर्ष तरी नाही,’ असं ती म्हणाली.

वाचा : स्वरा भास्करविरोधात आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अकाऊंट ब्लॉक

सैफ आणि करिनाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली आणि करिनाने २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरला जन्म दिला. तैमुरच्या जन्मानंतर करिना दोन वर्ष बॉलिवूडपासून दूर होती. दोन वर्षांनंतर तिने ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून पुनरागमन केलं.