19 October 2020

News Flash

तैमुरने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; म्हणाला…

करिनाने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर होताय व्हायरल...

आज १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्यदिन. आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. राजकिय मंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये सेलिब्रिटी किड तैमुरने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपल्या अनोख्या शैलीत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियांकाने दिल्या शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

Freedom in our minds, faith in our words and pride in our souls… #HappyIndependenceDay

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

अवश्य पाहा – कॅलिफोर्नियाने केला सुशांतचा मरणोत्तर सन्मान; बहिणीने स्वीकारला पुरस्कार

करिना कपूरने आपल्या मुलाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत तैमुर हातात तिरंगा पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोद्वारे तैमुरच्या वतीने करिनाने देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “मनात स्वातंत्र्य, स्वत:च्या शब्दांवर विश्वास आणि भारतीय असल्याचा अभिमान…, सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोवर केली आहे. तैमुरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही मिनिटांत दोन लाख ७६ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या फोटोला लाईक केलं आहे. शिवाय हजारोंच्या संख्येने या फोटोवर कॉमेंट केले जात आहेत.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 3:40 pm

Web Title: kareena kapoor khan posts taimur ali khans pic 15 august independence day of india mppg 94
Next Stories
1 कंगना संतापली; म्हणाली, “मला भाजपानं तिकिटाची ऑफर दिली होती, पण…”
2 कॅलिफोर्नियाने केला सुशांतचा मरणोत्तर सन्मान; बहिणीने स्वीकारला पुरस्कार
3 “चीनमधून आयात न थांबवता आपण आत्मनिर्भर कसं होणार?”
Just Now!
X