16 December 2017

News Flash

मुंबई विमानतळावर दिसली नवाब कुटुंबियांची झलक

आतापर्यंत तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 11:16 AM

करिना कपूर खान, सैफ अली खान आणि तैमुर

नवाब कुटुंबियांना आपण मुंबई विमानतळावरून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी स्वित्झरलँडला जाताना पाहिलं. करिना कपूर खान, सैफ अली खान आणि त्यांचा मुलगा तैमुर अली खान यांचे अनेक फोटो तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढंच काय तर स्वित्झर्लंडला फिरायला गेलेले अनेक फोटो घर बसल्या त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत होते. आता हे नवाब कुटुंबिय व्हेकेशनवरुन पुन्हा मुंबईत आलं आहे. यावेळी सगळ्यांच्या नजरा या फक्त आणि फक्त तैमुरवर होत्या.

करिना, सैफ आणि तैमुर जेव्हा विमानतळावरुन बाहेर पडत होते तेव्हा छायाचित्रकारांनी त्यांच्या भोवती फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी सैफने तैमुरला कडेवर घेतले होते. सध्या करिना अनेकदा मेकअपशिवायच दिसते. यावेळीही तिने कोणताही मेकअप केला नव्हता. तर सैफ नेहमीप्रमाणेच त्याच्या नवाबी थाटात होता, गोंडस तैमुरने टी-शर्ट घातले होते.

छायाचित्रकार जेव्हा त्याचे फोटो काढत होते तेव्हा तो अगदी कौतुकाने त्या साऱ्यांकडे बघत होता. त्याला आतापासूनच आपण स्टार कीड असल्याचे कळले की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. आतापर्यंत तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत पण या व्हेकेशनमुळे पहिल्यांदा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एकत्र फोटो मिळाला.

या तिघांचे एकत्र फोटो मिळण्याचं अधिकतर श्रेय या तिघांच्या चाहत्यांना मिळतं. इन्स्टाग्रामवर कधी आई- मुलाचे तर कधी बाप-लेकाचे फोटो सतत शेअर करत आले आहेत. त्यांच्या या कट्टर चाहत्यांमुळेच अनेकांना या नवाब कुटुंबाची झलक पाहायला मिळाली.

First Published on August 13, 2017 11:16 am

Web Title: kareena kapoor khan saif ali khan family vacation is over and they are back home with baby taimur see photos