बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे कायमच चर्चेत असते. रुपेरी पडद्यावर कायमच आपल्या अभिनयकौशल्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी ही अभिनेत्री लवकरच छोट्या पडद्यावर सुद्धा आगमन करणार आहे. टेलिव्हिजन विश्वातील तिच्या या पदार्पणासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शो मधून ती छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विविध भूमिका उत्तमप्रकारे निभावणारी ही अभिनेत्री स्पर्धकांच्या नृत्याचे कसे परीक्षण करते हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.
कोरिओग्राफर बॉस्को मार्टीस व रॅपर रफ्तार यांच्यासोबत करीनाही परीक्षण करत आहे. टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी खूप वेळ द्यावा लागतो ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे. पण करीनाने नुकतच एका मुलाखतीत तिने सांगितले की, “मी टेलिव्हिजन पदार्पण करत असले तरीसुद्धा मी फार वेळ शूटिंगसाठी देऊ शकत नाही. मी दिवसातून केवळ आठ ते दहा तासंच शूटिंग करणार आहे.” तैमूरसाठी तिने हा निर्णय घेतला आहे.
“मी आठ तासांपेक्षा जास्त वेळ शूटिंग करणार नाही असे मी निर्मात्यांना सांगितले आहे. कधीतरी मी बारा तास शूटिंग करू शकते. निर्मात्यांनी ही अट मान्य केली आहे. ही ऑफर आल्यानंतर मी काही वेळ विचार केला पण आता स्पर्धकांचे परीक्षण करण्यासाठी मीच खूप उत्सुक आहे. ‘डान्स इंडिया डान्स’चा रंगमंच सुद्धा बदलला आहे. सेटवर जवळपस २०० कॅमेरा असणार आहेत.” असेही करीनाने सांगितले.
टेलिव्हिजन विश्वाच्या इतिहासात सगळ्यात या शोसाठी करिनाला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं समजतंय. ” जर एखाद्या पुरुष परीक्षकाला ठराविक रक्कम मिळत असेल तर स्त्रीला सुद्धा तितकीच मिळाली पाहिजे. मी जेवढे तास या गोष्टीसाठी देतेय, तेवढंच मानधन मला मिळतंय.” असं करीना म्हणाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2019 12:10 pm