27 November 2020

News Flash

दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सांगितल्यावर सैफच्या प्रतिक्रियेवर करीना म्हणाली; “दुर्दैवाने घरात …”

ऑगस्ट महिन्यात अभिनेत्री करीना कपूर खानने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी जाहीर केली.

ऑगस्ट महिन्यात अभिनेत्री करीना कपूर खानने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी जाहीर केली. सोशल मीडियावर आणि सर्वच स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सैफ अली खान आणि करीनाला तीन वर्षांचा मुलगा तैमुर आहे. आता नवीन वर्षांत सैफच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं सैफला सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली की, “दुर्दैवाने माझ्या घरात फिल्मी असं काहीच झालं नाही. कारण सैफ फारच रिलॅक्स्ड आणि नॉर्मल होता. साहजिकच तो खूशसुद्धा होता. आम्ही हे प्लॅन केलं नव्हतं पण दोघंही त्याचा आनंद घेत आहोत.”

आणखी वाचा : सैफने सांगितला पतौडी पॅलेसवर करीना व मुलांसोबत राहण्याचा प्लॅन

करीनाने नुकतंच लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आणि ती मुंबईला परतली. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेला अद्वैत चंदन ‘लाल सिंग चड्ढा’चं दिग्दर्शन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 1:25 pm

Web Title: kareena kapoor on saif reaction when she told him about 2nd pregnancy ssv 92
Next Stories
1 अष्टमीच्या निमित्ताने तेजस्विनीची मार्मिक पोस्ट
2 सैफने सांगितला पतौडी पॅलेसवर करीना व मुलांसोबत राहण्याचा प्लॅन
3 राजकुमार रावने ‘बुगी वुगी’साठी दिलं होतं ऑडिशन; परीक्षक म्हणाले..
Just Now!
X