25 February 2021

News Flash

मुलगा की मुलगी? सैफच्या बहिणीची ‘ती’ पोस्ट पाहून चाहत्यांनी विचारला प्रश्न

पाहा काय होती पोस्ट...

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता करीनाची नणंद आणि सैफ अली खानची बहिण सबा अली खानने करीनाच्या डिलीवरीशीसंबंधीत एक हिंट देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे असे म्हटले जात आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि त्याचा मुलगा इब्राहिमचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘तुम्ही ओळखू शकता… हा मुलगा कोण आहे? याचे उत्तर खाली कमेंटमध्ये द्या’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सैफ आणि त्याचा मुलगा इब्राहिमचा असला तरी चाहते कमेंटमध्ये करीनाच्या डिलीवरीसंबंधीत प्रश्न विचारताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba (@sabapataudi)

एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत विचारले, ‘करीनाने मुलाला जन्म दिला आहे का?’ तर दुसऱ्या एका युजरने ‘परत मुलगा झाला का?’ अशा कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर ‘मुलगा झाली की मुलगी झाली’ अशी कमेंट केली आहे. सबाच्या या पोस्टवरुन करीनाची डिलीवरी झाली असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वीही सबाने केलेली पोस्ट चर्चेत होती. सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यामध्ये सैफ अली खानचे फोटो कोलाज केले होते आणि त्यासोबत ‘द क्वाडफादर’ असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 11:10 am

Web Title: kareena kapoor sister in law saba ali khan hints actress delivery avb 95
Next Stories
1 ‘निम्मीज पीजी’, पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तीन मुलींच्या आयुष्यावरील गोष्ट
2 अभिनेता रणवीर शौरी करोना पॉझिटिव्ह
3 संदीप नाहर : हत्या की आत्महत्या? पोलिसांनी फेटाळली ‘ती’ शक्यता
Just Now!
X