12 December 2018

News Flash

ओव्हर न्युडिटी आणि बोल्ड दृश्यांमुळे करीनाने नाकारला ‘मेन्टल है क्या?’

मागच्या आठवड्यात सिनेमाचा फर्स्ट लुक रिलिज

चार दिवसांपूर्वीच मेंटल है क्या या सिनेमाचे पोस्टर्स झळकले आणि त्यानंतर कंगना रणौत आणि राजकुमार रावच्या या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु झाली. या सिनेमाचा विषय काय असेल? या सिनेमात कंगनाची भूमिका कशी असेल? याची चांगलीच चर्चाही रंगली. मात्र या सिनेमात ही जोडी दिसणार नव्हती हे तुम्हाला माहित आहे का? होय कंगना करत असलेली भूमिका करीना कपूरला ऑफर करण्यात आली होती. मात्र सिनेमातील ‘ओव्हर न्युडिटी’ आणि ‘बोल्ड’ दृश्यांचा भरणा असल्याचे कारण देत करीनाने हा सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर हा सिनेमा कंगनाला मिळाला अशी माहिती समजते आहे.

र राजकुमार राव ऐवजी इम्रान हाश्मीला विचारण्यात आले होते. मात्र त्यानेही हा सिनेमा करण्यास नकार दिला. २०१३ मध्येच बदतमिझ दिल या नावाने या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार होते आणि हा सिनेमा करीना कपूर आणि इम्रान हाश्मी यांना ऑफर करण्यात आला होता. या दोघांनीही हा सिनेमा करण्यास नकार दिला. हा सिनेमा काळाच्या पुढचा आहे तसेच यात अनेक बोल्ड सीन्स आहेत ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो असे सांगत करीनाने हा सिनेमा सोडला. ‘पिंकव्हिला डॉटकॉम’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आता २०१८ मध्ये या सिनेमात कंगना रणौत आणि राजकुमार राव काम करत आहेत. कंगनाने या सिनेमातील भूमिकेसाठी तातडीने होकार दिल्याचे समजते आहे. या सिनेमाची कथा कनिका धिल्लों यांनी लिहिली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश कोवेलमुदी हे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.

मागच्या आठवड्यात कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ या आगमी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. यात कंगनासोबत राजकुमार रावही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील काही पोस्टरची मालिका सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या चित्रपटातून राजकुमार आणि कंगना ही हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

First Published on March 14, 2018 2:34 am

Web Title: kareena refused role in mental hai kya over nudity report