28 January 2021

News Flash

Karenjit Kaur The Untold Story of Sunny Leone trailer : “पॉर्नस्टार व देहविक्री करणाऱ्यांमध्ये काय फरक?”

'पॉर्नस्टार' ही ओळख न लपवता भारतीय चित्रपट सृष्टीत तिनं काम करायचं पक्क ठरवलं. 'पॉर्नस्टार' हा आपल्या माथ्यावर लागलेला कलंक तिनं पुसण्याचा प्रयत्नही केला नाही.

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी ‘बिगबॉस’ या रिअॅलिटी शोमधून पॉर्नस्टार सनी लिओनीनं भारतात पाऊल ठेवलं. त्यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती सनी लिओनी ठरली होती. आपली ‘पॉर्नस्टार’ ही ओळख न लपवता भारतीय चित्रपट सृष्टीत तिनं काम करायचं पक्क ठरवलं. ‘पॉर्नस्टार’ हा आपल्या माथ्यावर लागलेला कलंक तिनं पुसण्याचा प्रयत्नही केला नाही, तिच्या वाट्याला बॉलिवूडमध्ये भूमिकाही तशाच आल्या. बॉलिवूडमध्ये येऊन तिला बरीच वर्षे उलटली असतील मात्र तिची जुनी ओळख अजूनही कायम आहे. ही ओळख घेऊन भारतात वावरणं नक्कीच सोप्प नव्हतं. शिख कुटुंबात वाढलेली ही करनजीत कौर ही पॉर्नस्टार सनी लिओन झाली कशी? हे जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना आजही आहे. तिचा हा प्रवास ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिक वेबसिरिजमधून लवकरच उलगडणार आहे.

‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘सनी अशी व्यक्ती आहे जिला भारतात प्रेम आणि द्वेष दोन्ही मिळालं, अनेकांसाठी सनी म्हणजे अशी व्यक्ती आहे जी भारतीय स्त्रीनं कधीही नसलं पाहिजे’ अशा वाक्यात ट्रेलरच्या पहिल्या काही सेकंदात सनीची ओळख करून देण्यात आली. शालेय आयुष्यात सनी कशी होती? या क्षेत्रात ती कशी गेली? अशा अनेक प्रश्नांची उत्तर या वेबसीरिजमधून उलगडत जाणार आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमधून सनी जशी होती आणि जशी आहे तशीच ती मांडण्यात आली आहे. पॉर्नस्टार होण्याआधी सनी अमेरिकेतील बहुचर्चित अडल्ट मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकली होती. तिच्या आयुष्यात घडलेले असे अनेक प्रसंग जे कधीही समोर आले नाहीत ते या वेब सीरिजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

१६ जुलै रोजी या वेब सीरिजचा पहिला भाग ZEE5 India वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचा या वेब सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 12:34 pm

Web Title: karenjit kaur the untold story of sunny leone trailer out
Next Stories
1 रायगडावरील मेघडंबरीतल्या वादग्रस्त फोटोप्रकरणी रितेशने मागितली माफी
2 अन्न-वस्त्र-निवारा आणि कॅमेरा – प्रियदर्शन जाधव (सेलिब्रिटी लेखक)
3 #HappyBirthdayRanveerSingh : रणवीर सिंगबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Just Now!
X