News Flash

‘कार्टी काळजात घुसली’ची शंभरी!

‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाने शतकमहोत्सवी प्रयोगांचा पल्ला गाठला आहे.

कार्टी काळजात घुसली

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनची निर्मिती असलेले आणि जवळपास वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर झालेल्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाने शतकमहोत्सवी प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग २१ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता विलेपार्ले येथीस दीनानाथ नाटय़गृहात होणार आहे.
या प्रयोगास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची कन्या राधा मंगेशकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘कार्टी’च्या शतकमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने मुंबईत ‘एमआयजी’ क्लब येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेस प्रशांत दामले, तेजश्री प्रधान यांच्यासह नाटकातील नीता पेंडसे, पराग डांगे हे कलाकार व तंत्रज्ञही उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रशांत दामले म्हणाले, ‘या नाटकातील ‘कालिदास कान्हेरे’ ही भूमिका करणे माझ्यासाठी आव्हान होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कुटुंबाची साथ, मित्रपरिवाराचा विश्वास आणि रसिकांच्या प्रेमामुळे ३३ वर्षांच्या रंगभूमीवरील कारकीर्दीत मी ११ हजार नाटय़प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 2:16 am

Web Title: karti kaljat ghusli complete 100 episodes
Next Stories
1 मणीरत्नम यांचा चित्रपट हिंदीत
2 सोनाली बेंद्रे करणार मराठीत पुनर्पदार्पण?
3 ‘धनगरवाडा’ एक दाहक वास्तव
Just Now!
X