19 September 2020

News Flash

मुंबईतील मशिदीबाहेर चेहरा झाकून कार्तिक-साराने काढला सेल्फी

ईदनिमित्त कार्तिक-सारा मुंबईतील एका मशिदीत पोहोचले.

कार्तिक आर्यन, सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघं इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यापूर्वी रणवीर सिंगने या दोघांची एकमेकांना ओळख करून दिली होती. शूटिंगदरम्यान कार्तिक-सारामध्ये चांगलीच मैत्री झाली आणि आता बऱ्याचदा हे दोघं एकत्र दिसतात. बुधवारी देशभरात रमजान ईद उत्साहाने साजरा केला गेला. ईदनिमित्त कार्तिक-सारा मुंबईतील एका मशिदीत पोहोचले. यावेळी दोघांनीही चेहरा झाकला होता.

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारासोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीत कार्तिकने रुमालाने तर साराने तिच्या दुपट्ट्याने चेहरा झाकला आहे. गर्दीत कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून कदाचित दोघांनी चेहरा झाकला असावा. या सेल्फीसोबत कार्तिकने ‘ईद मुबारक’ लिहित चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

Eid Mubarak 💫

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

वाचा : ‘वयाने मोठा पुरुष साथीदार चालतो मग स्त्री का नाही?’, प्रियांकाचा सवाल

कार्तिक आणि सारा ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये एकत्र झळकणार आहेत. सारा जेव्हा पहिल्यांदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये झळकली होती, तेव्हा तिने कार्तिकसोबत कॉफी डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. दोघांची ऑफस्क्रीन मैत्री तर चाहत्यांनी पाहिली, आता त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे चित्रपटातून लवकरच पाहायला मिळेल. दिल्ली आणि उदयपूरमध्ये चित्रपटाची शूटिंग पार पडली असून इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:41 pm

Web Title: kartik aaryan and sara ali khan hide their faces as they celebrate eid in mumbai ssv 92
Next Stories
1 Video: अक्षय कुमारला भेटण्यासाठी अनुपम यांचा अनोखा स्टंट
2 लग्नानंतरही साराला राहायचंय ‘या’ व्यक्तीसोबत
3 अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोड’चा सिक्वल ?
Just Now!
X