करोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. अगदी युरोप, अमेरिकापासून आशिया खंडापर्यंत सर्व देशांमधील लोक करोनामुळे त्रस्त आहेत. भारतातही करोना विषाणूचा फैलाव नियंत्रीत करण्यासाठी ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे घरात बसलेला अभिनेता कार्तिक आर्यन वेळ घालवण्यासाठी चक्क भांडी घासत आहे.
कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भांडी घासताना दिसत आहे. गंमतीशीर बाब म्हणजे या व्हिडीओवर त्याने “कहानी घर घर की” असे कॅप्शन दिले आहे.
कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर भांडी घासणाऱ्या कार्तिकचे कौतुक देखील केले आहे.