25 November 2020

News Flash

‘कसौटी जिंदगी की- २’ साठी एकताला नवी ‘कोमोलिका’ सापडेना?

'तू सर्वोत्तम आहे, तुझ्यापेक्षा उत्तम कोमोलिका मिळूच शकत नाही' असं एकतानं म्हटलं आहे

उर्वशीनं कसौटी..मध्ये 'कोमोलिका' या खलनायिकेची भूमिका साकरली होती.

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका ‘कसौटी जिंदगी की’ परतणार अशा चर्चांना गेल्या काही महिन्यात उढाण आलं होतं. ही मलिका पुन्हा येणार याची फुसटशी कल्पना देऊन एकतानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली पण पुढे मात्र या मालिकेच्या पुनरागमनाविषयी तिनं मौनच धारण करणं पसंत केलं. त्यामुळे याविषयीच्या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या, पण नुकताच उर्वशी ढोलकियानं एक व्हिडिओ पोस्ट केल्यानं या मालिकेविषयी पुन्हा एकदा चर्चांना उढाण आलं आहे.

उर्वशीनं कसौटी..मध्ये कोमोलिका’ या खलनायिकेची भूमिका साकरली होती. या भूमिकेनं ती घराघरात पोहोचली होती. या भूमिकेसोबत तिच्या एकूणचं स्टाईलचीही चर्चा झाली होती. एकीकडे गेल्यामहिन्यात एकतानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली फेसबुक पोस्ट, तर दुसरीकडे उर्वशीनं शेअर केलेला व्हिडिओ यामुळे ही मालिका परतणार याची प्रेक्षकांना जवळजवळ खात्रीच झाली आहे. त्यातून एकतानं तू सर्वोत्तम आहे, तुझ्यापेक्षा उत्तम कोमोलिका मिळूच शकत नाही, असं म्हटलं आहे त्यामुळे ही मालिका परतण्याची शक्यता दाट आहे.

९ वर्षे ही मालिका छोट्या पडद्यावर चालली. सर्वाधिक टिआरपी असलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका होती. ‘२००१ मध्ये हदय पिळवटून निघत असल्याच्या वेदनादायक अनुभवातून मी जात होते त्यावेळी मी एका मालिकेचं लेखन केलं होतं. १७ वर्षांनंतर ही मालिका मी परत आणत आहे. आता पुन्हा एकदा मी माझ्या हृदयाचे तुकडे वेचून त्यापासून अप्रतिम कलाकृती निर्माण करणार आहे.’ अशी पोस्ट एकतानं गेल्यावर्षी लिहिली होती. या मालिकेत श्वेता तिवारी, सीजेन खान हे दोघंही मुख्य भूमिकेत होते. पण नव्या मालिकेसाठी मात्र एकता नवीन कलाकारांचा शोध घेत आहे अशाही चर्चा आहेत.

या मालिकेतील अनुराग प्रेरणा या जोडीसाठी एकता नवे चेहरे शोधत असली तरी यातली खलनायिका मात्र उर्वशी ढोलकियाच असू शकते असा कयास यावरून अनेकांनी बांधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 3:31 pm

Web Title: kasautii zindagii kay urvashi dholakia will return in this show hint suggested that
Next Stories
1 या फोटोत कोण आहे तुम्ही ओळखलं का?
2 सलमानला पाठिंबा दर्शवण्यासाठी कलाकारांनी घेतली ट्विटरची मदत
3 पुनमचंद बिष्णोईंची लघुशंका सलमानला पडली महागात
Just Now!
X