News Flash

कतरिनाच्या धमाकेदार बेली डान्स डान्सवर व्हाल फिदा, पाहा Video

पाहा, कतरिनाचा भन्नाट डान्स

सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजामुळे खासकरुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असणारी कतरिना कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये ती चर्चेचा विषय़ ठरत असते. सध्या सोशल मीडियावर कतरिना एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

कतरिनाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील असून फिल्मफेअरच्या युट्यूब चॅनेलवर तो शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २०१२ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना एक था टायगर या चित्रपटातील माशा अल्लाह या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

दरम्यान, कतरिना लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. तर सूर्यवंशीप्रमाणेच ती भूत या चित्रपटातही झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 4:34 pm

Web Title: katrina kaif belly dance on masha allah song video viral ssj 93
Next Stories
1 ‘महिलांना वय विचारु नका’; ३२ वर्षांची स्वरा स्वत:चं वय सांगते २५; कारण…
2 बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांना करोनाचं ग्रहण
3 कंगनाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; ईद आणि ख्रिसमसवर साधला निशाणा, म्हणाली…
Just Now!
X